अमरावती हत्येप्रकरणी एनआयएने दाखल केले आरोपपत्र, म्हटले- ‘आरोपींनी बनवली होती दहशतवादी टोळी’.

Spread the love

अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. एनआयएने या प्रकरणातील एकूण १५ साक्षीदारांची जबानी बंद कव्हरमध्ये न्यायालयाकडे सुपूर्द केले आहे, जेणेकरून या साक्षीदारांची ओळख उघड होऊ नये.

नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानाच्या समर्थनार्थ उमेश कोल्हेने व्हॉट्सअपवर पोस्ट केल्याचा दावा एनआयएने आपल्या आरोपपत्रात केला आहे. आरोपींनी उमेशच्या हत्येचा कट रचला आणि दहशतवादी टोळी तयार केली आणि सामान्य हेतूने हा गुन्हा केला. लोकांच्या मनात दहशत निर्माण करणे हा आरोपींचा मुख्य उद्देश होता. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी २१ जून २०२२ रोजी अमरावती येथील घंटाघर परिसरात आरोपींनी उमेशची निर्घृण हत्या केली.

आरोपपत्रात अब्दुल शेख, मोहम्मद शोएब, अतीब रशीद, युसूफ खान, इरफान खान, अब्दुल अरबाज, मुशफिक अहमद, शेख शकील, शाहीम अहमद, मुदस्सीर अहमद आणि शाहरुख खान यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार एनआयएने कलम १२० (गुन्हेगारी कट), ३०२ (हत्या), १५३-ए (धर्म, वंश, जन्मस्थान आणि भाषा इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) गुन्हा दाखल केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page