☯️यंदाची डाँ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हटके आणि ऐतिहासिक ठरणार..

Spread the love

▶️मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिलला १३२वी जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती म्हणजे, देशभरात मोठा उत्सव समजला जातो. भीमसैनिकांकडून महिनाभरापूर्वी वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी नियोजन केले जाते. मात्र यंदाची बाबासाहेबांची जयंती हटके आणि ऐतिहासिक ठरणार आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याची रजिस्ट्री करण्यात आली आहे. तर १४ एप्रिलला या ताऱ्याचं नामकरण होणार आहे. तर सर्वसामान्यांना हा तारा मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर पाहता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी या ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे.

▶️अमेरिकेत अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी ‘इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री’ नावाची एक संस्था असून, या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावं देण्यात येतात. यासाठी भारतीय चलनात नऊ हजार रुपये शुल्क भरावे लागते. यंदाची बाबासाहेबांची जयंती आगळीवेगळी व्हावी म्हणून राजू शिंदे यांनी, या संस्थेकडे बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. शिंदे यांनी ९ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता आणि आता त्यांना त्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. तर १४ एप्रिलला या ताऱ्याचं लाँचिंग होणार असून स्पेस रजिस्ट्री ॲपच्या संकेतस्थळावरून हा तारा पाहता येऊ शकतो. तसेच मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर हा तारा पाहता येणार आहे.

▶️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गावागावात बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने मिरवणुका काढल्या जातात. यावेळी ‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेंगा’ अशी घोषणा दिली जाते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत देखील ही घोषणा देण्यात आली होती. त्यामुळे ही घोषणा लक्षात घेता राजू शिंदे यांनी बाबासाहेबांच्या नावाने अवकाशातील ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे.

▶️विशेष म्हणजे अशाप्रकारे कोणालाही आपल्या नातेवाईकांचे किंवा स्वतःचं नाव या ताऱ्याला देता येत नाही. यासाठी नाव दिले जाणाऱ्या व्यक्तीचे खूप व्यापक काम असायला हवं, त्यासाठी संबंधित संस्थेकडून विविध कागदपत्रांची पडताळणी केली जाते.

▶️त्यामुळे तब्बल दीड महिन्यापासून प्रक्रिया करत आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर अखेर आकाशातील तार्‍याला बाबासाहेबांचं नाव मिळालं असल्याचं राजू शिंदे म्हणाले..

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page