☯️वात दोष…..

Spread the love

▶️स्नायूंचे थकणे, सांधेदुखी, सांधे आखडणे, डोके दुखी, अपचन, वजन घटणे, मरगळ, शरीर ताठरणे, शरीर थरथरणे, अशक्तपणा, पोटदुखी, कोरडेपणा, भीती या आजारांना त्रासाला नक्कीच शरीरात वात दोष वाढला…

☯️शरीरात वात वाढलाय तर काय खावे…

किमान १ चमचा शुद्ध तूप एकावेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे. (त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदरपासून ठेवणं आवश्यक आहे.)

☯️वात प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं…?
आहारात सहा रस मानले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट हे ते रस. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट आणि खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू आणि तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. या लोकांनी कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियांची चटणीही यांच्यासाठी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यांमध्ये या लोकांसाठी मूग चांगला.

☯️वात वाढल्या नंतर काय खाऊ नये…
सर्व प्रकारच्या कोरड्या उसळी, कोरडे अन्न, थंड अन्न, स्नेह नसलेले पदार्थ (तूप, तेल विरहीत पदार्थ), मेथी, शेपू, पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या, मैद्याचे तळलेले पदार्थ, डबा बंद पदार्थ, शिळे अन्न, उशिरा आंबवलेले अन्न पदार्थ, वाळवलेली फळे, आंबट फळे, आंबट पदार्थ, मासे, पपई, अननस, कच्च्या भाज्या, कच्चा कांदा, चणाडाळ, वाळलेले काजू, सोयाबिन, पांढरा तसंच काळा वाटाणा, कारले, मका, काकडी, पांढरा कोंडा, बकरीचे-डुकराचे मांस हे वात दोषांची वाढ करतात. या यादीकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की वृद्धापकाळात‘अती अभ्यास’करून हेच पदार्थ खातांना व्यक्ती आढळतात. म्हणजेच डाएट करण्याच्या अट्टहासात आपण जे खायला नको तेच खातो. हे पदार्थ संख्यात्मक दृष्ट्या कदाच‌ति चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील. पण गुणात्मक दृष्ट्या संपूर्ण शरीराची स्थिती बिघडवतात.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page