
⏩वयाच्या ७९ वर्षी उत्तर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन झाले आहे. ११ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून उत्तरा या काही आजारांशी झुंज देत होत्या. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
उत्तरा यांनी आजवर अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. त्यांना ‘तमस’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळूण पाहिले नाही. त्यांनी सुमित्रा भावे यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले. आज वयाच्या ७९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, वहिनी व भाचा असा परिवार आहे.
अभिनेते गिरीश परदेसी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उत्तरा बावकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे काल रात्री पुण्यात निधन.. भावपूर्ण श्रद्धांजली’ असे म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.