☯️रशियात ज्वालामुखी फुटला, २० किमी उंचीपर्यंत राखेचे ढग उसळले

Spread the love

⏩रशिया- रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक धोका निर्माण झाला आहे.रशियाच्या कामचटका द्वीपकल्पातील शिवलुच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुमारे २० किलोमीटर उंचीपर्यंत राखेचा ढीग दिसत होता.ज्वालामुखीच्या स्फोटामुळे बाहेर पडलेली राख पश्चिमेस ४०० किमी, तर दक्षिणेत २७० किमीपर्यंत पसरली असून ती आणखी पसरत आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे.

कामचटका ज्वालामुखी उद्रेक प्रतिसाद दलाने सांगितले की, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर विमान वाहतूक विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्वालामुखीचा १५ किमी उंचीपर्यंतचा उद्रेक कधीही होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अधिका-याने सांगितले की, स्फोटानंतर धुराचे लोट ७० किलोमीटर दूर असलेल्या क्ल्युची आणि कोझीरेव्हस्क भागात पसरले आहेत. त्यामुळे लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगण्यात आले आहे. ज्वालामुखीच्या उद्रेक झालेल्या परिसरात ८.५ इंच जाड राखेचा थर जमला आहे. ज्वालामुखीपासून बचाव करण्यासाठी उस्ट-कामचत्स्की महानगरपालिका क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी शाळा बंद केल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने ६ हजार किमीच्या परिघातील सर्वच शाळा बंद केल्या आहेत. तसेच लोकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत नागरिकांना घरांतच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हा ज्वालामुखी खूप सक्रिय झाला आहे आणि कधीही उद्रेक होऊ शकतो असा इशारा कामचटका ज्वालामुखीय उद्रेक प्रतिसाद पथकाने आधीच दिला होता. शिवलुच ज्वालामुखीच्या आत लाव्हा वेगाने वाढत असल्याचे पथकाने म्हटले होते. त्याच्या विवरातून भरपूर वाफ आणि वायू सतत बाहेर पडत होता. किरकोळ स्फोटही झाले. अखेरीस शिवलुच ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि सुमारे १० किमी उंचीपर्यंत राखेचा धूर दिसला.

पृथ्वीवर अनेक ज्वालामुखी आहेत यातील शिवलुच ज्वालामुखी १०,७७१ फूट उंच आहे. हा कामचटका द्वीपकल्पातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे. गेल्या १० हजार वर्षात ६० वेळा भयंकर स्फोट झाले आहेत. आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट २००७ मध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page