⏩️रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेली, दिलीपराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेली
‘डोंगराने गाव गिळला’ या नवीन
कादंबरीचे प्रकाशन दि. १२ एप्रिलला
सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
मांडकी-पालवण शिक्षण संकुलात तंजावरचे राजे श्रीमंत शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन होणार आहे.
⏩️चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे सर्वेसर्वा श्री.
प्रकाश देशपांडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.दिलीपराज प्रकाशनचे श्री. राजीव बर्वे, कृषितज्ज्ञ डॉ.सुरेश धुमाळ हे प्रमुख अतिथी म्हणून प्रकाशन सोहोळ्याला उपस्थित राहाणार आहेत.कृषि, सहकार तज्ञ डॉ.तानाजीराव चोरगे हे साहित्यिक आहेत.
⏩️साहित्य क्षेत्रात त्यांनी आपला
आगळावेगळा ठसा उमटविला आहे.
डॉ. तानाजीराव चोरगे यांनी १६
कादंबऱ्या, सहा कथासंग्रह, चार
नाटके, एक एकांकिका, कृषि
सहकारावर १७ पुस्तके, अन्य दोन
पुस्तके, ‘झेप’ आत्मचरित्र लिहिले आहेत.
⏩️त्यांच्या अनेक ग्रंथांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. स्वतःच्या अनुभवातून, प्रत्यक्ष पुराव्यानिशी,घडलेल्या घटनांवर आधारीत लिखाण करण्याची डॉ.तानाजीराव चोरगे यांची शैली आहे. डॉ. चोरगे यांच्या
नवीन कादंबरीत प्रकाशन सोहोळ्याला साहित्यप्रेमींसह मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे
आवाहन करण्यात आले आहे.