रत्नागिरी : टाटा आयपीएल फॅन पार्क आता आपल्या रत्नागिरी शहरामध्ये पाहायला मिळणार आहे. शनिवार दिनांक ८ एप्रिल २०२३ रोजी दुपार ३.३० पासून राजस्थान रॉयल विरुद्ध दिल्ली कॅपिटल व संध्याकाळी. ७.३० वाजता चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन तसेच रविवार दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी दुपार ३.३० पासून गुजरात टायटन विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर संध्याकाळी. ७.३० वाजता
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग इलेव्हन हे सामने कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार, रत्नागिरी येथे मोठ्या एलईडी स्क्रीनवर पहावयास मिळणार आहे.
▶️तरी या आयपीएल फॅन पार्क मॅचचा आनंद रत्नागिरीतील क्रिकेट प्रेमींनी लुटावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष किरण सामंत, कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी व सचिव बिपिन बंदरकर व इतर सर्व रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे पदाधिकारी, सदस्य यांनी केला आहे. याबाबत आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी बिपीन बंदरकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.