नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे वारंवार चर्चेत असतात. तर भाजपने काही मंत्र्यांची लीस्ट तयार केली असून त्यांची लवकरच मंत्रिपदावरून हकालपट्टी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.विशेष म्हणजे नारायण राणे यांचं नावही या लिस्टमध्ये असल्याचं बोललं जात होतं.
अशातच ठाकरे गटातील नेत्यांनी तर नारायण राणेंचं मंत्रिपद कधीही जाऊ शकतं, असा दावा काही दिवसांपूर्वी केला आहे. मात्र या चर्चा आणि शक्यता फेटाळून लावणारी घटना समोर आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं कौतुक केलं आहे. स्थानिक पातळीवरील संघर्षातून उभा राहिलेला नेता, असं म्हणत मोदींनी राणे यांचं कौतुक केलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मोदींनी त्यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतुक देखील केलं आहे.केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मद्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्थानिक पातळीवरून वरती आलेले, लोकप्रिय नेते आणि प्रशासक असं नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. तसेच MSME क्षेत्राला गती देण्यासाठी ते भरपूर मेहनत घेत आहेत. त्यांना दीर्घ तसेच निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.