मारुती कारमधून विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना लांजा पोलिसांनी ताब्यात घेतले

Spread the love

लांजा : मारुती कारमधून विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना लांजा पोलिसांनी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ताब्यात घेतले आहे. शनिवारी ८ एप्रिल रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास भांबेड येथील हर्दखळे फाटा या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी गोवा बनावटीचा दारू साठा व मारुती कार असा ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री भांंबेड हर्दखळे फाटा या ठिकाणी मारुती 800 क्र.( MH 12 EG 2756 ) ही कार येथील ग्रामस्थांना संशयास्पद आढळून आल्याने ग्रामस्थांनी याबाबतची माहिती लांजा पोलिसांना दिली. यावेळी लांजा पोलिसांची गाडी गस्तीवर असल्याने ही माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच लांजा पोलीस जागेवर पोहचले व कारमधील दोनी संशिताना ताब्यात घेतले. त्यानंतर कारची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला.

पोलिसांनी मारुती कार व दारूसाठ्यासह कारमधील संदीप बबन सानप आणि संदीप रावसाहेब सानप (रा. मेहतरी , जि.नगर) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page