राजापूर : राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनाचा पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आवश्यकतेनुसार पंढरीनाथ आंबेरकर याची पॉलिग्राफी, ब्रेन मॅपिंग व नार्को अॅनालिसीस चाचणी करणे गरजेचे आहे, असे पोलिसांकडून न्यायालयापुढे सांगण्यात आले. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आंबेरकरच्या अशा प्रकारच्या
चाचण्या पोलिसांकडून घेण्यात आल्या तर काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.