
मुंब्रा (प्रतिनिधी) मुंब्रा येथे एका बर्थडे पार्टी करीत असताना दारुच्या नशेत झालेल्या वादामुळे एका 29 वर्षीय तरुणाची भोसकुन हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.या घटनेनंतर मुंब्रा पोलीसांनी दोन भावांना अटक केली आहे.
मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरात शनिवारी रात्राै.1 सुमारास ही घटना घडली.या ठिकाणी वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती.तिथे सर्वजण पार्टीचा आनंद लुटत होते.मद्यप्राशन केल्याने उदय कदम या 29 वर्षीय तरुण आणि दोन्ही आरोपींमध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात आरोपीने त्या व्यक्तिचा खून केला.त्यात दोन्ही आरोपीं भावांनी 29 वर्षीय उदय कदम याचा खून केला.यात कदम याचा जागीच मृत्यु झाला.या घटनेची माहीती पोलीसांना मिळताच दोन्ही आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली.
पोलीसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.पार्टी झालेल्या वादावरुन ही चाकून केल्याचे त्यांनी पोलीसांना सांगितले.याबाबत मुंब्रा पोलीसांनी दोन्ही आरोपींना खुनाच्या गुन्हाखाली अटक केली आहेत.याबाबत अधिक तपास मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. निवृत्ती कोल्हटकर करीत आहेत.