
रत्नागिरी : अनेक वर्ष बंद असलेल्या रत्नागिरी बस स्थानकांच्या बाबतीत आज रत्नागिरीतील काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली या बस स्थानकाचे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी आंदोलन केले
रत्नागिरी बस स्थानक अनेक वर्षे बंद स्थितीत आहे त्यामुळे प्रवास करणाऱ्या जनतेला उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. त्यासाठी एसटी स्टँड शेजारी महिला जिल्हाध्यक्षा ॲड अश्विनी आगाशे व मिडिया प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते व त्रस्त नागरिक एसटी महामंडळ विरोधी हातात फलक घेऊन आंदोलन केले. कंत्राटदारा वर गुन्हा दाखल करा , एसटी महामंडळचा निषेध असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, जनतेला दिला धोका मग प्रशासनाला ठोका, आवाज कोणाचा सामान्य जनतेचा, अश्या घोषणांनी सदर परिसर दणाणून गेला होता. अश्या घोषणा करत एसटी बस स्थानक परिसरातून चालत घोषणा देत स्टॉप वर ताटकळत उभे असलेल्या नागरिकांमध्ये सामील झाले
लवकरच सदर काम त्वरित चालू करून पूर्ण करावे अन्यथा काँग्रेस पक्ष एसटी महामंडळ विरोधात तीव्र आंदोलन छेडेल अश्या आशयाचे निवेदन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्याकडे महिला जिल्हाध्यक्ष ॲड अश्विनी आगाशे यांनी दिले.
तदप्रसंगी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत,सोशल मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, संगमेश्वर तालुकाध्यक्ष दत्ता परकर, महिला तालुकाध्यक्ष रिझवणा शेख , शहर अध्यक्ष रमेश शहा, रवींद्र खेडेकर ,सीमा राणे, उदय मोहिते सुदेश ओसवाल इत्यादी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.