भूमिअभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

खेड :- खेह तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी जमिनीचे काम करून देण्यासाठी एका पक्षकाराकहून ६ लाख ५० हजार रूपये उकळल्याप्रकरणी संबंधित पक्षकाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोधावर गुन्हा दाखल केला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानंद टोपे आणि सायली धोत्रे अशी दोधांची नावे आहेत . तालुक्यातील वेताळवाडी येथील एक पक्षकार येथील जमिनीच्या कामासाठी तालुका भूमिअभिलेख कार्यालयात जुलै २०२१ मध्ये गेले होते , आपले काम पूर्ण करून देण्यासाठी भुमिअभिलेख कार्यालयातील शिवानंद टोपे व सायली धोत्रे या कर्मचाऱ्यांनी जुलै २०२१ ते जानेवारी २०२३ या कालावधीत आपल्याकहे ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली , रक्कम न दिल्यास तुमच्या जमिनीच्या कामावर परिणाम होईल काम होणार नाही , अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने आपल्या तकारीत नमूद केले आहे . काम होण्यासाठी या दोन कर्मचाऱ्यांनी खेड उपअधीक्षक कार्यालय , फिर्यादीच्या वेताळवाडी येथे घरी , कधी स्वतः तर कधी त्यांच्या हस्तकाद्वार रोख तसेच ऑन लाईन स्वरूपात ६ लाख ५० हजार रुपये स्वीकारले होते . या प्रकरणी संबंधित पक्षकाराच्या तक्रारीनुसार येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page