खेड : खेड येथील नगरपरिषद दवाखान्यासाठी ११ आस्थापनांची पदे मंजूर असतानाही सद्यस्थितीत केवळ एक नर्सच कार्यरत असल्याची बाब पुढे आली आहे. दवाखान्यात वैद्यकीय अधिकारीच नसल्याने गर्भवतींसाठी असलेले प्रसुतिकागृह बंद ठेवण्याची नामुष्की नगर प्रशासनावर ओढवली आहे. शहरातील तरूणांवर उपचारांसाठी असलेला नगर परिषद दवाखाना अखेरची घटका मोजत असून नागरिकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे १७०८३ आहे. शहराचा विस्तारही दिवसेंदिवस वाढतच आहे. एकीकडे शहराचा विस्तार वाढत असताना दुसरीकडे मात्र शहरातील रूग्णांवर उपचारासाठी असलेला नगरपरिषद दवाखाना अखेरची घटका मोजत आहे.