⏩नवी दिल्ली: मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सन्मान म्हणून विविध देशातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंना (महिला आणि पुरुष) आजीवन सदस्यत्व दिले आहे. या खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघातील पाच खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय खेळाडूमध्ये तीन पुरुष आणि दोन महिला खेळाडूंचा समावेश आहे.
⏩माजी कर्णधार एम. एस धोनी, युवराज सिंह आणि सुरेश रैना या तीन पुरुष खेळाडू आणि झुलन गोस्वामी आणि मिताली राज या महिला खेळाडूंना मेरीलेबोन क्रिकेट क्लबने आजीवन सदस्यत्व दिले आहे. याशिवाय इंग्लंडच्या पाच, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंचा या यादीत समावेश आहे. जगभरात कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने दोन विश्वचषक जिंकले आहेत. २००७ आणि २०११ विश्वचषकात धोनीने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते.
⏩अष्टपैलू युवराज सिंह या दोन्ही संघाचा सदस्य होता. युवराज सिंह याने दोन्ही विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. धोनी आणि युवराज यांनी टीम इंडियाला अनेकदा विजय मिळवून दिला. युवराज धोनीने यांच्याशिवाय सुरेश रैना यालाही अजिवन सदस्यत्व दिलेय. सुरैश रैना याने १३ वर्षाच्या वनडे करिअरमध्ये साडेपाच हजार धावांचा पाऊस पाडलाय.