✴️स्वातंत्र्यवीर सावरकर घरा घरा पर्यत पोचणावा:- ना.उदयजी सामंत
⏩रत्नागिरी : प्रतिनिधी
आज राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना -भाजप कार्यकर्त्यांची स्वातंत्रवीर सावकर गौरव यात्रा नियोजना संदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सर्व प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी १२ एप्रिलला रत्नागिरीमध्ये हजारोच्या संख्येत स्वातंत्रवीर सावरकर यांची गौरव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले.
⏩या सभेत स्वातंत्रवीर सावरकर यांची गौरव यांत्रे संदर्भात चर्चा करण्यात आली.या सभेला उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांना जबाबदारी वाटप करून देण्यात आली.ही यात्रा संध्याकाळी सूरू होणार असुन सर्वसामान्य रत्नागिरीकर सावरकर गौरव यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. या सभेला, भाजपचे नेते प्रमोद जठार, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, शिवसेने जिल्हाप्रमुख राहुल पंडित,तालूका प्रमुख बाबूशेठ म्हाप, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, युवा तालुका अधिकारी तुषार साळवी, अभिजित दुडे, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, राजू भाटलेकर, शिवसेना – भाजप पक्षाचे सर्व तालुक्याचे तालूका प्रमुख, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.