⏩️ ED – CBI विरोधी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
⏩️नवी दिल्ली l 05 एप्रिल
काँग्रेससह १४ विरोधी पक्षांनी सीबीआय (CBI) व सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) च्या गैरवापराविरोधात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. नेत्यांसाठी कायदा वेगळा नाही. त्यामुळं त्यांच्या प्रकरणांच्या बाबतीत कुठलीही वेगळी मार्गदर्शक तत्त्वं ठरवून देता येणार नाहीत, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. केंद्र सरकारविरोधात एकवटलेल्या विरोधी पक्षांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी विरोधी पक्षांच्या वतीनं गेल्या महिन्यात ही याचिका दाखल केली होती. गेल्या काही वर्षांत सीबीआय आणि ईडीनं दाखल केलेल्या खटल्यांमध्ये वाढ झाली आहे. यातील ९५ टक्के खटले केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारच्या विरोधातील पक्षांच्या नेत्यांवर आहेत. त्यामुळं या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वं घालून द्यावीत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठापुढं या याचिकेवर सुनावणी केली. ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर ही याचिका मागे घेण्यात आली.
**************************
▶️जाहिरात तसेच अचूक बातम्यांसाठी
___________________________
जनशक्तीचा दबाव मुंबई
_________________________
▶️ RNINO.MAHMAR2014/59698
———————-‐—————–
▶️https://janshaktichadabav.com/
_________________________
न्यूज च्या व्हॉट्सॲप* 🪀 *ग्रुपला जाॅईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
_________________________
https://chat.whatsapp.com/Ff90SEBVh11JuyK8bWHR4M
_________________________
▶️
दबाव लोकशक्तिचा निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा