
संगमेश्वर : इ रिक्षा व्यावसायिकांच्या विरूद्ध कडक कारवाई तुरळ चिखली येथील रिक्षाव्यावसायिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. इ. रिक्षा विरोधात येथील रिक्षाव्यावसायिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सहाय्यक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनाही पत्र दिले आहे. यावर योग्य कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा निर्णय संघटनेने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिली.