⏩दामोदर हॉल परेल(मुंबई) येथे शनिवारी 8 एप्रिलला रात्री 8 वाजता नाटकाचा प्रयोग
▶️साखरपा- नाट्यकला जपणारी कोंडगाव शिंदेवाडी येथील स्थानिक व सध्यस्थितीत मुंबई येथे असणारा संदीप दत्ताराम शिंदे हा ऐतिहासीक नाटक विररत्न बाजीप्रभू या नाटकात मुख्य असणाऱ्या बाजीप्रभूंच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.नावाजलेल्या महालक्ष्मी कलामंच या संस्थेचे हे नाटक असून शनिवार ८ एप्रिल रात्री ८.३० वाजता दामोदर हॉल परेल या ठिकाणी याचा प्रयोग होणार आहे.या नाटकाचा हा दुसरा प्रयोग असून प्रेक्षकांनी पहिल्या शोला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे याचा दुसरा प्रयोग याच ठिकाणी पार पडत आहे.
▶️महालक्ष्मी कलामंच याचे अध्यक्ष संगमेश्वर तालुक्यातील संजय मांडवकर कुरधुंडा गावातील आहेत.नाटककला जोपासता यावी या हेतूने त्यांनी या संस्थेची निर्मिती केली आहे.प्रकाश लाड यांनी या संपूर्ण नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.प्रसिद्ध लेखक विद्याधर शिवणकर यांनी या नाटकाचे लेखन केले आहे.या नाटकात सुमारे 24 पेक्षा जास्त कलाकार आहेत.या आधी सुध्धा या नाटक कंपनीने केलेल्या विर शिवाजी(30 प्रयोग)याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे.हे नाटक मुंबई,पुणे,कोकण, औरंगाबाद,गोवा आधी विभागात प्रचंड प्रेक्षक उपस्थीत पार पडले आहे.
▶️स्वतःचा फोटोग्राफी व्यवसाय सांभाळताना नाट्य क्षेत्राची पिढीजात आवड असणाऱ्या संदीप शिंदे हा कलाकार यात वीर बाजीप्रभू यांची भूमिका साकारणार आहे. हर हर महादेव,बाजीप्रभू यासारखे चित्रपटांना यश मिळाल्यानंतर नाट्यगृहात प्रेक्षकांचा सहभाग कसा लाभेल असा प्रश्न होता मात्र पहिल्या प्रयोगाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाल्याने आमचा आत्मविश्वास वाढला असून हा दुसरा प्रयोग आम्ही घेऊन आल्याचे संदीप शिंदे म्हणाले. तसेच कोंडगावचे हरहुन्नरी नाटक कलाकार कै.नाना शिंदे हे आपले गुरू असल्याचे सांगायला विसरले नाहीत.
▶️चार पिढ्यांचा यशस्वी वारसा असणाऱ्या गणेश नाट्य मंडळ कोंडगाव या मंडळाकडून माझा नाटक क्षेत्रात माझा प्रवेश झाला.१९५४ ला या मंडळाची स्थापना झाल्याचा इतिहास त्यांनी सांगितला.स्थानिक पातळीवरील कलाकार घेऊन नाटक करण्याची मज्जा वेगळी असल्याचे संदीप शिंदे म्हणाले.या आधी त्यांनी सुमारे 22 नाटकात काम केले आहे.यामध्ये अनेक ऐतिहासीक,सामाजिक,कौटुंबिक नाटकांचा समावेश आहे.
▶️सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे नाट्यगृहकडे प्रेक्षकांचा कल थोडा कमी झाला असला तरी आपल्याला नाटकाचा प्रत्यक्ष जिवंतपणा,साऊंड इफेक्ट्स,भावना अनुभवायच्या असतील उत्तम नाट्य रसिक हा नाट्यगृहातच आपल्याला पाहायला मिळतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि संस्कृती सर्वदूर पोहचविण्यासाठी आपण कायमच ऐतिहासिक नाटकात काम करत असतो.त्यामुळे ८ एप्रिल शनिवारी होणाऱ्या वीर बाजीप्रभु नाटक पाहायला दामोदर हॉल परेल या ठिकाणी नक्की या असे आवाहन संदीप शिंदे यांनी केली.