⚛️अदानी यांची २४ व्या स्थानावर घसरण
⏩️नवी दिल्ली l 05 एप्रिल
मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने जारी केलेल्या २०२३ च्या अब्जाधीशांच्या यादीत ही माहिती दिली आहे. जागतिक यादीत अंबानींचे प्रमुख प्रतिस्पर्धी गौतम अदानी यांची २४ व्या स्थानावर घसरण झाली आहे.
⏩️२४ जानेवारी रोजी अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी त्यांची संपत्ती १२६ अब्ज डॉलर होती. अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्याच्या संपत्तीत झपाट्याने घट झाली. अदानी यांची एकूण संपत्ती आता ४७.२ अब्ज डॉलर्स असून अंबानी यांच्यानंतर दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय असल्याची माहिती फोर्ब्सने दिली आहे.
⏩️जगातील २५ सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती २,१०० अब्ज डॉलर इतकी आहे. वर्ष २०२२ मध्ये हा आकडा २,३०० अब्ज डॉलर होता. गेल्या वर्षभरात जगातील टॉप २५ श्रीमंतांपैकी दोन तृतीयांश श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली असल्याचे फोर्ब्सच्या यादीत म्हटले आहे.
⏩️भारतात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर तर गौतम अदानी दुस-या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार शिव नाडर हे तिसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. सायरस पूनावाला हे देशातील चौथे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. लक्ष्मी मित्तल हे पाचव्या स्थानावर आहेत. ओपी जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल सहाव्या, सन फार्माचे दिलीप सांघवी सातव्या आणि डीमार्टचे राधाकृष्ण दमानी आठव्या क्रमांकावर आहेत.
⏩️जगात अंबानी नवव्या स्थानी
मुकेश अंबानी हे ८३.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील ९ व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सने म्हटले आहे की, गेल्या वर्षी अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ही १०० अब्ज डॉलरहून अधिक कमाई करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. रिलायन्सचा व्यवसाय तेल, दूरसंचार ते रिटेल अशा विविध क्षेत्रात पसरलेला आहे.
***************************
▶️जाहिरात तसेच अचूक बातम्यांसाठी
___________________________
जनशक्तीचा दबाव मुंबई
___________________________
▶️ RNINO.MAHMAR2014/59698
———————-‐———————-
▶️https://janshaktichadabav.com/
___________________________
न्यूज च्या व्हॉट्सॲप 🪀 ग्रुपला जाॅईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
___________________________
▶️
दबाव लोकशक्तिचा निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा