⏩संगमवश्वर: राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून या कामामुळे महामार्गाला लागून असणारे दगडाचे डोंगर फोडण्यासाठी बोरवेल कास्टिंग चा वापर केला जात आहे. या ब्लास्टिंगमुळे परिसरामध्ये हायवेला लागून असणाऱ्या घरांचे नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे.त्या संदर्भात पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या त्या पैकी कुरधुंडा येथे होत असलेल्या ठेकेदाराच्या मनमानी विरोधात राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश रत्नागिरी- रायगडचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी दिले आहेत.
⏩पालकमंत्री यांच्या दौऱ्या दरम्यान त्यांनी कुरधुंडा येथिल ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर ठेकेदारांच्या बेजबादार आणि मनमानी कारभारा विरोधात ताशेरे ओढत जिल्हाधिकारी देवेद्र सिंग यांच्या उपस्थिती संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
⏩बोरवेल ब्लस्टिंगला परवानगी नसताना ब्लस्टिंग कां करता याचा जाब विचारला? या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या दालनात तातडीची बैठक लावून निर्णय देण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिले आहेत.
▶️जाहिरात तसेच अचूक बातम्यांसाठी
जनशक्तीचा दबाव
▶️ RNINO.MAHMAR2014/59698
▶️https://janshaktichadabav.com/
न्यूज च्या व्हॉट्सॲप* 🪀 *ग्रुपला जाॅईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…!
▶️https://chat.whatsapp.com/ExQnETG6d3REyet9BNszIt
▶️
दबाव लोकशक्तिचा निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा