
दिवा ( प्रतिनिधी) दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेवून गरमीच्या दिवसात थंड पाण्याचा आस्वाद घेता यावा या करीता येथील रोटरी क्लब दिवा आणि एस.एम.जी विद्यामंदीर शाळेतर्फे थंड पाण्याचे फिल्टर गावदेवी मंदीराला भेट म्हणून देण्यात आली आहे.या फिल्टरमुळे बाजूला असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेतील विद्य़ार्थांनाही फायदा होणार आहे.
सध्या गरमीचे दिवस सुरु झाले आहेत.नागरीकांना थंड पाणी खाजगी दुकानातून विकत घ्यावे लागते.गावदेवी मंदीरात देवीच्या दर्शनाला अनेक भाविक नियमित येत असतात.तेथे येणाऱ्या या भाविकांना थंड पाणी फिल्टर केलेले शुद्ध पाणी पिता यावे यासाठी रोटरी क्लब दिवा आणि एस.एम.जी.विद्यामंदीर दिवा यांच्या सौजन्याने पाणी शुद्ध व थंड करणारा फिल्टर भेट म्हणून दिला आहे.तसेच साबे गाव येथील प्रसिद्ध विठ्ठलमंदीरातही लवकरच फिल्टर देण्यात येणार आहे.
आज मंदीर व्यवस्थापनाला फिल्टर भेट देताना रोटरी क्लब ऑफ दिवाचे अध्यक्ष श्री अभिषेक ठाकूर, SMG विद्यामंदिरचे श्री. स्वप्निल गायकर, डॅा. प्रशांत भगत सर, हर्षद भगत व वैष्णव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.