कर्जत : प्रतिनिधी (सुमित क्षिरसागर) नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील खांडा येथील तुलशी गृहसंकुलनासमोर माथेरान बसची वाट पाहत बसलेल्या महिलेची दोन तोळे सोन्याची गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी गळ्यातून हिसकावून चोर पसार झाल्याची घटना घडली असुन, सदर घटना ही नागरिकांच्या समोर घडल्याने मात्र आश्चर्यव्यक्त केले जात आहे. तर पीडित महिलेने धावघेत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
माथेरान येथे राहणारी ४५ वर्षीय महिला आखाडे ही आपल्या पती सोबत नेरळ मधून माथेरान येथे जाण्यासाठी नेरळ खांडा येथील तुलसी गृहसंकुलना समोर माथेरान बसची वाट पाहत उभे होती. परंतू बसला येण्यासाठी उशीर असल्याने आखाडे यांचे पती हे बाजूला खरेदीसाठी गेले होते. तर सदर महिला ही बस स्टॉपच्या कठड्यावर बसली होती. यावेळी अर्धवट तोंड झाकलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणाने आखाडे या महिलेच्या जवळ येत गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची दोन तोल्याची सोन्याची गंठण चोरून सदर चोरटा हा तुलशी गृहसंकुलनात असलेल्या युनियन बँक समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर बसलेल्या तरुणाच्या मागे बसून पसार झाला. सदर घटना ३१ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली असुन, या घटने संदर्भात सदर महिलेनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असुन, नेरळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७९/२०२३, भा. द. वि. सं कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, तर घटनास्थळाची नेरळ पोलीसांनी पाहणी करत सी.सी.टीव्ही फुटेज चेक केले असता सदर सी.सी.टीव्ही कॅमेऱ्या मध्ये अर्धवट तोंड बांधून आलेले चोर हे कैद झाले असुन, सदर चोर हे बदलापूरच्या दिशेने गेले असल्याचे पोलिसांकडून प्राथमिक अंदाज लावत सदर गुन्ह्याची उकल करण्यासाठी आपली तपास चक्र फिरवले आहे. तर सदर गुन्ह्याचा तपास हा नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई. श्रीकांत राजाराम काळे हे करीत आहे. तर भर दिवसा मोटारसायकल वर आलेल्या चोरांनी नागरीकांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरच गंठन चोरी केल्याने मात्र नेरळ मध्ये सोनसाखळी चोरांची दहशत वाढल्याची व नागरिकांच्या देखत सदर घटना घडली असल्याने तसेच नागरिकांनी कोणत्याही प्रकारची सतर्कता दाखवली नसल्याने मात्र चोरांना पळून जाण्यास सोपे झाले असल्याची चर्चा सुरू आहे. तर सदर गुन्हयांची उकल नेरळ पोलस कशा प्रकारे करणार या कडे मात्र नागरिकांचे लक्ष लागले आहे.