रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिली शहीद सुभेदार अजय ढगळे यांना मानवंदना

Spread the love

चिपळूण येथिल मोरवणे येथे शासकीय इतमामात अंतसंस्कार

रत्नागिरी प्रतिनिधी

रत्नागिरी :भारत-चीन सीमेवर देशसेवा बजावताना शहीद झालेले सुभेदार अजय ढगळे यांना चिपळूण येथे त्यांच्या राहत्या घरी उपस्थित राहून रत्नागिरी -रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना.उदयजी सामंत यांनी उपस्थित राहून मानवंदना दिली आहे.
भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागची रेकी करण्यासाठी गेलेले मोरेवणे गावचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे देशसेवा करत असताना शहीद झाले. शहीद अजय ढगळे हे कारगील याआधी झालेल्या लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज बहादुर टिममध्ये देखील होते.यावेळी शहीद अजय ढगळे यांना चिपळूण येथिल त्यांच्या राहत्या गावी शासकीय इतमामात अंतसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने चिपळूण तालुक्यासह जिल्हयात शोककळा पसरली आहे.यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग,जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी पुजार,माजी आमदार सदानंद चव्हाण,आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page