रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील प्रौढानेदारूच्या नशेत आत्महत्या

Spread the love

रत्नागिरी :- तालुक्यातील पाली येथील प्रौढाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी , ३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा . सुमारास उघडकीस आली . कुमार बबन नाथगोसावी ( ५५ , रा . पाली बाजारपेठ , रत्नागिरी ) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे . नाथगोसावी यांना दारूचे व्यसन होते . दारूच्या नशेतच परिसरातील आंब्याच्या झाडाला नायलॉनची दोरी बांधून त्यांनी गळफास घेतला . या प्रकरणी नातेवाईकांनी पाली पोलिस दूरक्षेत्रात खबर दिली . पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला . याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page