संगमेश्वर तालुक्यातील चिखली कानालवाडी येथे माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२५ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. मंदिराचा दुसरा तपपूर्ती सोहळा व माघी गणेश जयंती उत्सव सोहळा होणार असून…
२५ रोजी अभिषेक, घटस्थापना, विणा, ध्वज पुजन, भजन, जन्मकाळाचे किर्तन, दर्शन सोहळा, पालखी मिरवणूक, हरिपाठ, जागराचे किर्तन असे कार्यक्रम आहेत.
२६ रोजी वासुदेव प्रभात फेरी, काकड आरती, काल्याचे किर्तन, दिपोत्सव, मुलांचे विविध गुणदर्शन होणार आहेत.
२७ रोजी सत्यनारायणाची पुजा, आरती, भजन, हरिपाठ आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच दररोज किर्तन संपल्यानंतर ‘माऊली कुणीकडे’ व ‘गाथा कृणाच्या माथा’ हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन कानालवाडी ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमाचे मृदुंगमणी व गायक म्हणून गौरव मेंगाणे, अक्षय कुंभार, जय तुळसणकर, सुमित कानाल, सुशिल कानाल हे काम पाहणार आहेत.
काकड आरती व हरिपाठ नेतृत्व यशवंत कुंभार, शांताराम सावरटकर, हरिश्चंद्र तुळसणकर, लवु कानाल, राजाराम लाखण, शंकर शिवडे, लक्ष्मण जोगळे हे करणार आहेत.
तर रांगव, शेनवडे, दहिवली, चिखली, वारकर सांप्रदायिक मंडळाचा सामूहिक जागर असणार आहे.