▶️संभाजीनगर- ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ‘वज्रमूठ’ सभेतून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीकास्र सोडलं. सत्तेसाठी मी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो, तर तुम्ही आता मिंध्यांचे काय चाटत आहात? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना विचारला आहे.
▶️उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, “आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीत वार करतो? बरं ठीक आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलो होतो. हो आलो होतो. पण आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही अधिक घट्ट आहोत.”
▶️“मध्यंतरी अमित शाह पुण्यात येऊन गेले. त्यांनी माझ्यावर आरोप केले. मी सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले, असं ते म्हणाले. मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही, असं नाहीये. पण मला आवरावं लागतं. काही शब्द, भाषा त्यांनाच (बाळासाहेब ठाकरे) शोभणारी आहे. मला ती भाषा शोभणारी नाही. पण मी त्यांना (अमित शाह) फक्त एवढंच म्हणालो की, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो. तर तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटत आहात?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
▶️“बिहारमध्ये आधी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार होतं. आता तेच सरकार पुन्हा स्थापन झालंय. चांगली चाललेली सरकारं फोडायची, हा किती भयानक प्रकार आहे. पण त्यावेळी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार पाडून तुम्ही नितीशकुमार यांचं काय चाटत होतात? हा माझा सवाल आहे. आता तुम्ही संगमांसोबत सत्तेत आहात. पण त्याच संगमांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मग संगमांनी हिसका दाखवल्यानंतर आता तुम्ही संगमांचं काय चाटत आहात?” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
▶️जाहिरात तसेच अचूक बातम्यांसाठी*
*जनशक्तीचा दबाव*
▶️ RNINO.MAHMAR2014/59698
▶️https://janshaktichadabav.com/
न्यूज च्या व्हॉट्सॲप* 🪀 *ग्रुपला जाॅईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…!
▶️https://chat.whatsapp.com/ExQnETG6d3REyet9BNszIt
▶️
दबाव लोकशक्तिचा निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा