⏩वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसतात; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Spread the love

▶️ठाणे- वीर सावरकरांचा अपमान केल्यामुळे मणिशंकर अय्यर यांना जोडे मारणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा वरसा सांगणारे लोक आता राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्या राहुल गांधींनी वारंवार वीर सावरकरांचा अपमान केला त्यांच्यासोबत बसण्याचे पाप काही लोक करत आहेत, हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे. परंतु आम्ही मात्र वीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही. या सरकारमधली कोणतीही व्यक्ती ते खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

▶️स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. वीर सावरकर हे देशभक्त होते, राष्ट्रभक्त होते, प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढली आहे. पूर्वी लोक हिंदुत्व हा शब्द उच्चारायला कचरत होते. परंतु २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हिंदुत्वाचा मान सन्मान जागा झाला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

▶️काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्यामुळे याला उत्तर म्हणून राज्यभरात आता सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. सावरकर गौरव यात्रेत सहभागी झालेल्या एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. जाणीवपूर्वक हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम काही लोक करत आहेत. वीर सावरकरांचे विचार रोखण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. देशातला हिंदू आता जागा झाला आहे. जागरुक झाला आहे आणि तो आता सक्रीय झाला आहे. पण काही लोक त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page