✴️हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आणि जुना धर्म
⏩अमेरिका – अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याने ‘हिंदुफोबिया’ आणि ‘हिंदू धर्माच्या विरोधकांचा’ निषेध करणारा ठराव विधानसभेत मंजूर केला आहे. हिंदूफोबियावर ठराव पारित करणारे जॉर्जिया हे अमेरिकेचे पहिले राज्य ठरले आहे. हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आणि जुना धर्म आहे, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे . जॉर्जियातील सर्वात मोठ्या हिंदू आणि भारतीय-अमेरिकन समुदायांपैकी एक असलेल्या अटलांटा उपनगरातील फोर्सिथ काउंटीचे प्रतिनिधी लॉरेन मॅकडोनाल्ड आणि टॉड जोन्स यांनी हा ठराव मांडला होता.
⏩गेल्या काही दशकांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये हिंदू-अमेरिकन लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हिंदू धर्माचे उच्चाटन करणार्या आणि त्याच्या पवित्र ग्रंथांवर हिंसाचार आणि छळाचा आरोप करणार्या काही शिक्षणतज्ञांनी हिंदूफोबियाला संस्थात्मक रूप दिले आहे असे या ठरावामध्ये म्हटले आहे.
⏩हा ठराव मंजूर झाल्याबद्दल अमेरिकन-हिंदू समाजाने आनंद व्यक्त केला आहे. मॅकडोनाल्ड आणि जोन्स आणि इतर प्रतिनिधींसोबत काम करणे ही सन्मानाची गोष्ट आहे ज्यांनी या काऊंटी ठराव पास करण्याच्या प्रक्रियेत आम्हाला मार्गदर्शन केले असे कोलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिकाचे उपाध्यक्ष राजीव मेनन यांनी म्हटलं आहे.
⏩गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये स्थलांतरित हिंदू समाजाप्रती द्वेषाच्या घटना पाहायला मिळत आहेत. हिंदू-अमेरिकन लोक धार्मिक घटकांकडून त्यांच्या द्वेषाचे लक्ष्य बनले आहेत. आहेत. हिंदूंवर हल्ल्याच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर हा ठराव महत्वपूर्ण मानला जात आहे.
⏩वैद्यक, विज्ञान आणि अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, वित्त, शिक्षण, बांधकाम, ऊर्जा, किरकोळ व्यापार अशा विविध क्षेत्रात अमेरिकन-हिंदू समुदायाचे मोठे योगदान असल्याचे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. योग, आयुर्वेद, ध्यान, भोजन, संगीत, कला या क्षेत्रातील हिंदू समाजाच्या योगदानामुळे सांस्कृतिक जडणघडण समृद्ध झाल्याचेही त्यात म्हटले आहे. हे अमेरिकन समाजाने मोठ्या प्रमाणावर स्वीकारले आहे आणि लाखो लोकांचे जीवन सुधारले आहे.
✴️हिंदु फोबिया म्हणजे काय?
⏩हिंदु धर्माविषयी लोकांच्या मनात खोटे भय ,खोटी दहशतीची भावना निर्माण करणे म्हणजे हिंदू फोबिया निर्माण करणे होय. हा शब्द हिंदू धर्म विरोधी लोकांकडुन हिंदू धर्माला अणि हिंदू धर्मातील संस्कृती जीवनशैली इत्यादी गोष्टींना लक्ष्य करण्यासाठी प्रामुख्याने वापरला जात आहे. हिंदू धर्माला एक कटटर हिंसावादी अणि असहिष्णू धर्म म्हणून जगासमोर सिदध करायला, हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी काही समाजकंटक प्रयत्न करीत आहे.आपले हे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी समाजकंटकांकडून जागोजागी देशात तसेच परदेशात हा खोटा हिंदू फोबिया निर्माण केला जात आहे.