मुंबई – आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 2 सामन्यांच आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील दुसरा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला 2 एप्रिल रोजी संध्याकाळी बंगळुरुची चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. पलटणचा हा सामना जिंकून मोहिमेची विजयी सुरुवात करण्याचा मानस असणार आहे. या सामन्यातून गेल्या 2 वर्षांपासून वेटिंग पीरियडवर असलेला अर्जुन तेंडुलकर याला पदार्पणाची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अर्जुन मुंबईच्या ताफ्यात 2021 पासून आहे. मात्र त्याला गेल्या दोन्ही मोसमात प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मात्र मिळालेली नाही. मुंबईने अर्जुनला 2021 मध्ये 20 लाख या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं होतं. त्यानंतर 2022 मध्ये आणखी 10 लाख मोजून एकूण 30 लाख रुपयात आपल्यातच कायम ठेवलं. त्यामुळे आयपीएलच्या 15 व्या मोसमात तरी संधी दिली जाईल, असं म्हटलं जात होतं. मात्र अर्जुनचा वेटिंग पीरियड हा आणखी एका वर्षाने वाढला.
आता 2 वर्षांचा वेटिंग पीरियड संपलाय. अर्जुनचं मुंबईत तिसरं वर्ष सुरु झालंय. मात्र संधी काही मिळालेली नाही. यामुळे आता आरसीबी विरुद्ध अर्जुनला संधी मिळणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्स टीम – रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.
आरसीबी टीम – फॉफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, हिमांशु शर्मा, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, अनुज रावत, वानिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर , मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, रीस टॉपले, मनोज वानखेडे, राजन कुमार, अविनाश सिंह, सोनू यादव, आकाश वशिष्ठ आणि आकाश दीप।