IPL 2023: पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ धावांनी केला पराभव; DLSच्या नियमानुसार पंजाबने जिंकला सामना

Spread the love

मुंबई- कोलकाता नाईट रायडर्सचा ७ धावांनी केला पराभव; D

IPL 2023: पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ धावांनी केला पराभव; DLSच्या नियमानुसार पंजाबने जिंकला सामना

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३च्या १६व्या हंगामाचा दुसरा सामना शनिवारी मोहालीत बिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार कोलकाता नाईट रायडर्सचा पंजाब किंग्जने ७ धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सला जिंकण्यासाठी १९२ धावांचे लक्ष्य होते. परंतु पावसाने सामान्यात खोडा घातला. तेव्हा कोलकाता संघाचे १६ षटकांत ७ बाद १४६ धावा झाल्या होत्या. पण यानंतर सामना होऊ शकला नाही, त्यामुळे पंजाब किंग्जला ७ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा ऑल राउंडर आंद्रे रसलने सर्वात जास्त १९ चेंडूत ३५ धावा केल्या होत्या. आंद्रे रसेलने चौफेक फटकेबाजी करत ३ चौकार आणि २ षटकार मारले होते. तर व्येंकटेश अय्यर २८ चेंडूत ३४ धावांवर बाद झाला होता. अय्यरने ३ चौकार आणि १ षटकार लगावला होता. तसेच कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने १७ चेंडूत २४ धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि १ षटकार लगावला.

दुसरीकडे पंजाब किंग्जच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे तर अर्शदीप सिंग गोलंदाजीचा भेदक मारा करून सर्वाधिक फलंदाज बाद केले. अर्शदीपने ३ षटकांत १९ धावांत ३ फलंदाजांना बाद केले. याशिवाय सॅम करण, नॅथन एलिस, सिकंदर रझा आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून १९१ धावा केल्या. पंजाब किंग्जसाठी भानुका राजपक्षेने ३२ चेंडूत सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार मारले. याशिवाय पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने २९ चेंडूत ४० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार मारले. कोलकाता नाईट रायडर्सकडून टीम साऊदीने सर्वाधिक २ झेलबाद केले. उमेश यादव शिवाय सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page