▶️मा. सभापती जया माने,युवासेना जिल्हाप्रमुख विनय गांगण,जिल्हा युवासेना समन्वयक दुर्गेश साळवी यांनी मुख्य उपस्थिती
➡️आबासाहेब कॉलेज सिनियर कॉलेज साखरपा याठिकाणी आज युवासेना कॉलेज युनिटची स्थापना करण्यात आली.या कार्यक्रमाला मा.सभापती जया माने,युवासेना जिल्हाप्रमुख विनय गांगण,जिल्हा युवासेना समन्वयक दुर्गेश साळवी, उपतालुका प्रमुख काका कोलते,प्रवीण जोयशी, आयटीसेना तालुका प्रमुख केतन दुधाने, कोंडगाव ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कदम, मंदार आठल्ये,दीपक गोवरे,शहरप्रमुख सिद्धेश पावसकर,कुणाल शिंदे, सागर तांदळे, मंदार मंदार जोयशी, पारस साखरे,राज सावंत, सूरज माने,अजिंक्य किर, सुमित पावसकर,आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
➡️यावेळी सुयश चव्हाण याची युवक कॉलेज युनिट प्रमुख,तर युवती प्रमुख पदी वैष्णवी रामाणे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे अविनाश कांगणे, ओंकार सुर्वे, साहिल पांचाळ,सूरज मांडवकर,हितेश चव्हाण,साहिल मांडवकर, रोहित भातडे यांची युवा कार्यकरणी मध्ये निवड झाली .त्याचप्रमाणे जस्मिनी सुर्वे, चिन्मयी सुर्वे, हेमांगी बाईंग, वेदांगी जोयशी, जान्हवी शिंदे, अदिती भिसे, अनामिका लिंगायत यांची युवती कार्यकरणी मध्ये निवड झाली.
➡️यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यकरणीच्या फलकाचे अनावरण करून व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्याना नियुक्तीपत्र देण्यात आली.यानंतर मा.सभापती जया माने,जिल्हा युवासेना प्रमुख विनय गांगण,जिल्हा युवासेना समन्वयक दुर्गेश साळवी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना उत्तम काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच वरिष्ठांचा मार्गदर्शना खाली विविध समस्या सोडविण्यासाठी आपण तत्पर आहोत असा विश्वास व्यक्त केला.
➡️आरोग्य,रोजगार,शिक्षण या विषयांवर युवसेना युनिट कार्यरत राहणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका आय टी सेना प्रमुख केतन दुधाने,पारस साखरे,सिद्धेश पावसकर,कुणाल शिंदे,अजिंक्य किर,राज सावंतआदींनी मेहनत घेतली.