
विवाह स्वर्गातच ठरवले जातात व साजरे होतात पृथ्वीवर. हिंदू धर्मात सोळा संस्कारांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार विवाह मानला गेला आहे. विवाह म्हणजे दोन जीवांचा प्रीतिसंगम व शरीरसंगम असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. मात्र हा संगम उत्तम झाला पाहिजे हीच अपेक्षा आहे.
विवाहस्थळी पुरुष व स्त्री (वधू व वर) हे ब्राह्मण, इष्टमित्र, समाज, नातेवाईक आणि अग्नी यांच्या साक्षीने पतीपत्नी म्हणून विवाहबद्ध होतात, त्या संस्काराला विवाह असे म्हणतात.
थोडक्यात, विवाह म्हणजे सहवासोत्सुक जीवांना समाजाने दिलेला धार्मिक विधीयुक्त संकल्पनेचा पवित्र आशीर्वाद.
तसेच स्वैराचाराचे संभाव्य धोके टाळण्यासाठी व एकूण समाजाचे स्वास्थ्य ठीक राहावे यासाठी प्राचीन काळापासून स्त्रीपुरुषातील नैसर्गिक नात्यास एक उदात्त स्वरूप यावे
म्हणून स्त्रीपुरुषास एकत्र येऊन कुटुंब संस्था स्थापण्याकरिता समाजाने दिलेला हा मांगल्यप्रद परवाना होय.Horoscope Adversary Key Guide in Marriage Matchmaking
गुण मिलन :-
सध्याच्या काळात लोक विवाह जुळवताना वंश, जात, पोटजात, सामाजिक दर्जा, निरोगित्व, अव्यंगत्व, आर्थिक स्थिती, रूप, शिक्षण, नोकरी इ. अनेक गोष्टी निरखून पारखून घेतात.
प्रथमदर्शनी सर्व काही एकमेकांना पोषक असल्यास,पसंती असल्यास नंतर मग पत्रिका जुळते का ते पाहायला येतात.
अलीकडे अशिक्षित लोकांपासून ते उच्च विद्याविभूषित लोकांच्या कुटुंबातही विवाह जुळविताना वधू-वरांच्या पत्रिकेचे गुणमेलन करून दोघांच्या कुंडल्या जुळतात की नाही हे पाहण्याचे प्रमाण भलतेच वाढले आहे.
प्रेमसंबंधातून प्रेमविवाह करावयाचा असल्यास ही पत्रिका मिलन व गुणमेलनासाठी इच्छित मुले-मुली किंवा त्यांचे पालक येताना दिसतात.
अविश्वास :-
याउलट आम्हांला विवाह करताना पत्रिका पाहावयाची नाही, आमचा ज्योतिषावर विश्वास नाही.
३६ गुण पडुनसुद्धा घटस्फोट होतातच की? मग गुणमेलन, पत्रिका कशासाठी पाहायच्या?
विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, आपल्या नशिबी जो जोडीदार असतो तोच आपल्या नशिबी येणार असेल तर मग पत्रिका बघून काय फरक पडणार आहे?
विवाह हा गुणमेलनावर टिकत नसून आपल्या इच्छाशक्तीवर, सामंजस्यावर, तडजोडीवर टिकत असतात, असे अनेक प्रश्न व आपले विचार मांडणारे लोकही समाजात भरपूर आहेत.
मग आता प्रश्न पडतो, ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कुंडली जुळवून विवाह लोकांनी करावा की वास्तविकतेच्या आधारावर परस्पर पसंतीने करावा.
याबाबत खोल विचार केल्यास असे लक्षात येते की हा प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धेचा, धार्मिकतेचा प्रश्न आहे.
कारण श्रद्धा असल्याशिवाय इच्छित फळ प्राप्त होत नाही.
विवाह विषय अजून काही लेख :-
१) सप्तम स्थान व वैवाहिक जीवन, २) विवाह गुण मेलन पद्धत,३) विवाह झटपट जमण्यासाठी उपाय,४) कसा पहावा विवाह योग,५) पत्रिका जुळत नाहीय विवाह होत नाहीय,विशेष लेख
मत :-
माझ्या मते, ज्योतिष हे अंधारमय जीवनात प्रकाश दाखविणारे साधन आहे.
ज्योतिषशास्त्राचा उपयोग भविष्य सांगण्यापेक्षा भविष्य घडविण्यासाठी व लोकांना फक्त मार्ग व दिशा दाखविण्यासाठी करावा.
कारण पूर्वजन्मीच्या पापपुण्याच्या आधारे या जन्मी आपणास दुःख किंवा जीवन जगावे लागते.
ते बदलत नाही. ते दुःख भोगल्याशिवाय या जन्मातून मुक्तता होत नाही.
अशा वेळी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कुंडलीतील संभाव्य गोष्टींचे मार्गदर्शन लोकांनी घेतल्यास त्यावर मार्ग,
उपाय काढता येईल व भविष्यात घडणाऱ्या परिणामाची तीव्रता कमी करून जीवन सुसह्य करता येईल या एकाच सात्त्विक उद्देशाने ज्योतिषाने मार्गदर्शनाचे काम केले पाहिजे.
ज्योतिषी हा सुद्धा एक माणूस असतो. जो चुकतो तो माणूसच असतो.
त्यामुळे ज्योतिषी चुकला म्हणून शास्त्र बदनाम करणे किंवा ते शास्त्रच नाही असे म्हणणे मूर्खपणाचे होईल.
ज्योतिषशास्त्राला व ज्योतिष मार्गदर्शकालाही अनेक मर्यादा आहेत. याचे भान भविष्य सांगताना करावे.
ज्योतिषी देव कधीच होवू शकत नाही. देवांनी आपले माहात्म्य व अस्तित्व टिकविण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्या हातात राखून ठेवल्या आहेत.
ज्योतिषी फक्त भविष्य मार्गदर्शन करू शकतो, तर त्या जातकाला शुभ-अशुभ फलांची प्राप्ती करून देण्याचे काम त्या जातकाचे कर्म व परमेश्वर करत असतो, याचे भान ठेवावे.
ज्योतिषशास्त्र :-
ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवनाला मार्गदर्शन करणारे एक होकारात्मक शास्त्र आहे.
हल्लीच्या वैज्ञानिक युगात मानवी जीवन सुखी व समृद्ध करणे हेच आद्य कर्तव्य समजले गेले आहे.
विविध प्रकारच्या त्रुटी भरून काढून मानवी जीवन जगणे सुसह्य करणे हे विज्ञानाचे कार्य असते.
हे कार्य ज्योतिष विज्ञान किंवा शास्त्र नक्कीच करू शकते, यात काही शंका नाही.
या विज्ञानाच्या साहाय्याने ज्योतिषांनी नव्या किंवा बदलत्या दृष्टिकोनातून वधू-वरांच्या कुंडल्या बघायला हव्यात. गेल्या ६०० हून अधिक वर्षांपूर्वीचे ज्योतिषशास्त्रातील नियम आता कालबाह्य झालेले आहेत.
केवळ गुणमेलन आता वैवाहिक जीवनाच्या आरंभाला अडसर होत चालले आहे.
यासाठी बदलता काळ, परिस्थिती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीसमानता,
स्त्रियांना कायद्याचे अतिरिक्त संरक्षण या आणि अशा अनेक गोष्टींचा विचार करून विवाह गुणमेलनासंदर्भात ज्योतिषशास्त्राची पुनर्बांधणी करावयास पाहिजे.
किंवा नवीन नियम ज्योतिषशास्त्राला दिले गेले पाहिजे.
फक्त पारंपरिक गुणमेलन पाहून विवाह करा किंवा करू नका, हे या काळात सांगणे सयुक्तिक वाटत नाही.
आधुनिक काळात ज्योतिषांनी ही नवनवीन विवाह मेलनाच्या पद्धती प्रस्थापित करून समाजापुढे मांडणे अत्यंत गरजेचे आहे.
कुंडली पाहून विवाह जुळविणे यामागील लोकांचा मुख्य उद्देश अंधश्रद्धा नसून वधूवरांचे भावी वैवाहिक जीवन परिपूर्ण, आनंदमयी व प्रगतीकारक जावे हाच असतो. थोडक्यात,
भावी वैवाहिक समस्या उत्पन्न न होता उत्तम वैवाहिक सौख्य, संतती सौख्य इ. मिळावे हीच लोकांची धडपड विवाहापूर्वी कुंडली पाहण्यासाठी पोषक असते.
मार्गदर्शन :- Horoscope Adversary Key Guide in Marriage Matchmaking
म्हणून ज्योतिष मार्गदर्शकांनी लोकांच्या या सात्त्विक मूळ उद्देशाचा आदर राखून काळजीपूर्वक सखोल वधू-वरांच्या पत्रिका पाहून त्या एकमेकांस पोषक आहेत की नाही,
त्यांनी लग्न करावे की नाही इ. अभ्यासपूर्वक सांगावे.
ही एक नैतिक व सामाजिक जबाबदारी समजून मार्गदर्शन करावे आणि असे जबाबदारीपूर्वक काम ज्योतिष मार्गदर्शकांनी केल्यास समाजास त्याचा फायदा होईल.
परिणामी समाजामध्ये विवाह संस्था किंवा विवाह संस्कार अबाधित राहतील.
सध्याच्या काळात वाढते घटस्फोटाचे प्रमाण, स्त्रियांवरील अत्याचार, छळ, स्त्रियांना मारझोड, हुंड्यासाठी स्त्रीहत्या किंवा मानसिक छळ, वैवाहिक मतभेद व असमाधानामुळे होणाऱ्या आत्महत्या,
वाढत्या कोर्टकचेऱ्या व त्याचा होणारा मानसिक त्रास इ. अनेक गोष्टी समाजामध्ये भीषण रूप घेत असलेल्या पाहावयास मिळतात.
वरील सर्व घटना कुंडली मेलन व विवाह मिलन करून नक्कीच टाळता येऊ शकतात.
त्यामुळे माझ्या मते विवाह जुळवताना किंवा विवाह करण्यापूर्वी प्रत्येकाने कुंडली पाहूनच विवाह करणे योग्य होईल.
अशा प्रसंगी कुंडली ही अडसर न होता मार्गदर्शक व पोषकच होईल.
फायदे :- Horoscope Adversary Key Guide in Marriage Matchmaking
पत्रिका पाहण्याचे अनेक फायदे आहेत. सामान्यतः ज्या व्यक्तीशी आपले जन्माचे संबंध येणार त्याची फारच थोडी माहिती एकमेकांना असते किंबहुना चुकीची माहिती आपणास दिली जाते.
आजकाल कोणालाही फारसा वेळ नसल्याने येणाऱ्या स्थळासंबंधी लोक खूप खोल व खरी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत नाहीत.
वरवर चांगले दिसणारे स्थळ विवाहानंतर वाईट किंवा चुकीचे वाटते. नंतर मग घटस्फोटाचा विचार केला जातो.
अशा प्रसंगी जर भावी जोडीदाराची कुंडली मिळाली तर त्या कुंडलीवरून बऱ्याच गोष्टींचे अचूक ज्ञान ज्योतिषाला होऊ शकते व वास्तविकता समोर मांडता येते.
पत्रिकेवरून खालील गोष्टी तपासता येतात-
१) जोडीदाराचे शिक्षण माहितीप्रमाणे आहे का?
२) त्याची नोकरी किंवा धंदा तो म्हणतो तसा आहे का ?
३) त्याची आर्थिक स्थिती कशी आहे?
४) त्याचे घरदार, घरातील माणसे कशी आहेत?
५) त्याचे आईवडिलांशी पटेल का? तो त्यांच्याबरोबर राहील का?
६) त्याला काही व्यंग आहे का?
७) तो व्यसनी किंवा मानसिक विकृतीचा आहे का?
८) त्याला भावी जीवनात वैवाहिक सौख्य, आरोग्य, आयुष्य, संतती इ. सौख्य कसे आहे?
अशा प्रकारे जर विवाहापूर्वी कुंडली पाहिल्यास नक्कीच फायदा होईल. कुंडली पाहण्याचा आणखी एक मुख्य फायदा म्हणजे हे जोडपे कितपत अनुरूप आहे हे सांगता येते.
मात्र त्यासाठी नुसते गुणमेलन न पाहता पत्रिकामेलन करणे गरजेचे आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.
आतापर्यंत आपण एका बाजूचा विचार केला.
जर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर विवाहपूर्वी कुंडलीमेलन हे विवाहामध्ये अडसर होऊ शकते,
असे कधी कधी वाटते.
दोष :-
विवाह गुणमेलनावेळी एक नाडी दोष आहे. मृत्युको आहे. मंगळदोष आहे, नक्षत्रदोष आहे इ.
काहीतरी कारणे सांगून काही ज्योतिषी विवाह करू नका असे सांगतात.
त्यावेळी परस्परांना अनुरूप असणारे स्थळही हातून निसटल्याने कुंडली ही विवाहामध्ये अडसर झाली असे काही लोकांचे मत नक्की होईल.
यासाठी ज्योतिष मार्गदर्शकांनी गुणमेलनाबरोबर एकमेकांच्या पत्रिकेचे मेलन अभ्यासपूर्ण केल्यास
व वरील दोषांचा शास्त्रमुख सखोल अभ्यास केल्यास उत्तम पर्याय सापडतील
व न जुळणारे विवाह ही जुळतील व अशा वेळी ज्योतिषी हा खरा मार्गदर्शक व दिशादर्शक उरेल.
मार्गदर्शकच :- Horoscope Adversary Key Guide in Marriage Matchmaking
अजून एक गुणमेलनासंदर्भात वाईट गोष्ट म्हणजे वधू वरांचे एकच जन्मटिपण दिले असता प्रत्येक ज्योतिषाचे मत व गुण वेगवेगळे येतात. एक ज्योतिषी विवाह करा म्हणून सांगतो तर एक विवाह अजिबात करू नका किंची पत्रिका मेलन होत नाही असे सांगतो.
त्यावेळी सर्वसामान्य जनता गोधळून जाते, परिणामी शास्त्राची बदनामी होते.
यामागील कारणाचा विचार केल्यास एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे प्रत्येक ज्योतिषाची बुद्धिमत्ता, अभ्यास, अनुभव, संशोधन, तर्कशास्त्र इ. वेगवेगळे असणे हे असू शकते.
यासाठी विवाह गुणमेलन कसे करावे याची एकच पद्धत विकसित करणे व सर्वांनी ती शिकवणे, समजून सांगणे आवश्यक ठरेल.
हाच उपाय यावर उरू शकतो. ज्योतिष मार्गदर्शकाबरोबर सुज्ञ नागरिकांचीही नैतिक जबाबदारी याप्रसंगी महत्त्वाची आहे.
विवाह विषयामध्ये गाढा अभ्यास व संशोधक वृत्ती असणाऱ्या सुज्ञ ज्योतिषाकडून मार्गदर्शन घेणे याप्रसंगी आवश्यक वाटते.
पाण्याच्या दोन्हीही बाजूंचा विचार केल्यास असे लक्षात येते की सुज्ञ ज्योतिषाकडे विवाहपूर्वी कुंडली बघून विवाह जमविणे चांगले व तितकेच आवश्यक ठरेल.
याप्रसंगी कुंडली मार्गदर्शकच ठरेल. अडसर नाही.
( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तर कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
⏩अधिक माहिती साठी संपर्क :-
⏩श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) ➡️ 9420270997
Astrologyist & Palmistry
Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन
(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)
⏩लिंक :- https://shreesevapratishthan.com/horoscope-adversary-key-guide-in-marriage-matchmaking/
⏩आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.