नवी दिल्ली : परदेशातून येणाऱ्या २ टक्के प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून चीन आणि दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी सकारात्मक येत आहेपार्श्वभूमीवर दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी बंधनकारक करण्याची सूचना करोना राज्य कृती दलाने राज्य सरकारला केली आहे.
देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने अलीकडेच सर्व अधिकारी आणि करोना राज्य कृती दलासोबत आढावा बैठक घेतली. परदेशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे