गुहागर : रामनवमीच्या दिवशी आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या प्राजक्ता देवकर (४९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आरेगावातील श्रीराम मंदिरात सुरु असलेल्या रामनवमीच्या उत्सवावर शोककळा पसरली. सायंकाळनंतरचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. गुहागर पोलिसांनी याबाबतची माहिती शुक्रवारी दिली.
शुक्रवारी (दि. ३१) शवविच्छेदन झाल्यानंतर प्राजक्ता देवकर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्राजक्ता देवकर या अल्पशा आजाराने गेले काही महिने आजारी होत्या. त्याचप्रमाणे त्या आर्थिक संकटातही होत्या.
रामनवमीच्या दिवशी सकाळी गावातील एका महिलांच्या सभेला त्या गेल्या होत्या. तेथून घरी आल्यावर त्यांनी दुपारी १२ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान राहात्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.