
राजापूर : राबूनही अपेक्षित उत्पन्न मिळतनाही.आंबा आणि काजू पीक हा कोकणचा आर्थिक कणा आहे नजीकच्या काही वर्षांमध्ये कोकणात काजू पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येन लक्षणीय वाढ झाली आहे.मात्र काजूला हमीभाव नसल्याने वर्षभर मेहनत घेऊनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळताना दिसत नाही. त्यामुळे शासनाने काजूला हमीभाव मिळवून द्यावा, अशी मागणी मनविसेचे लांजा तालुका संपर्क अध्यक्ष किरण रेवाळे यांनी केली आहे.काजू हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. मात्र बदलत्या हवामानामुळे आंब्याप्रमाणे काजू उत्पादनातही सातत्य राहत नाही. अशातच काजूला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना वर्षभर सन २०१९ मध्ये काजूला प्रति.किलो १५० ते १६० रूपये असा भाव होता.

त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोविड महामारीचे कारण देत काजूचे दर कमी केले. आता कोविड नसतानाही यावर्षी काजूचा दर ८० रूपये प्रतिकीलो पर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे कोकणातील काजू बागा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कोकणातील माणसे साधी आहेत. त्यामुळे कितीही नुकसान झाले तरी ते रस्त्यावर उतरणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नासाठी आमदार, खासदार,लोकप्रतिनिधी यांनाच आवाज उठवावा लागेल असे रेवाळे यांनी
सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६