दिवा : प्रतिनिधी दिवा शहरातील गणेश नगर येथील आरंभ इंग्लिश स्कूलमधील एका विद्यार्थिनीला शाळेची फी भरली नाही म्हणून आज परीक्षेला बसू दिले नाही. ही माहिती महिला उपशाखा अध्यक्ष कु. संध्या माने यांना मिळताच त्यांनी मनसे दिवा शहर पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दिवा शहर अध्यक्ष श्री.तुषार भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग सचिव परेश पाटील, उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम, मनविसे शाखा अध्यक्ष गौरव कदम आणि उपशाखा अध्यक्ष धनेश पाटील यांनी शाळा प्रशासनाची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.
वारंवार सूचना देऊनही वर्षभराची शाळेची फी भरली नाही म्हणून सदर पालकाच्या मुलीला शाळेत बसून न दिल्याचे मुख्याध्यापिकांनी यावेळी सांगितले. यावेळी मुलीच्या शिक्षणाचे नुकसान न करता तिला परीक्षेला बसू देण्याबाबत शाळेला सांगण्यात आले. सोबतच पालकांनीही वेळेवर शाळेची फि भरण्याबाबत पालकांनाही सूचना दिल्या. शाळेने संबंधित मुलीला पुढच्या सर्व विषयांच्या पेपरला बसवण्याचे मान्य केले असून सोबतच ज्या विषयाचा पेपर राहून गेला तो ही पुन्हा घेण्याचे आश्वासन मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. शाळाप्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचे दिवा मनसेने स्वागत केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६
८८९८८३४२३४/९६१९१०५७७३