अनेक आहार, जिम तज्ञा कडून मोड आलेले कडधान्य खाण्याचा सल्ला दिला जातो ,त्यामुळे प्रोटिन्स मिळतात ,
पण आपण एवढे *हेवी वर्क आउट किंवा व्यायाम* करत आहोत का *एवढे प्रोटिन्स* खायला, दुसरे म्हणजे कडधान्याला मोड आणून आपण त्यामधील अम्ल गुण वाढवतो व ते *पित्तवर्धक व रक्त दुष्टी* करणारे बनवतो ,अगोदरच कडधान्य हे वातूळ गुणाचे असतात त्यात मोड आणल्यामुळे ते वातरक्त दुष्टीकर होतात व गाऊट सारखे सांध्यांचे आजार निर्माण करतात व पचायला जड असल्यामुळे गॅसेस, पोट साफ ना होणे, पोट गच्च होणे, ऍसिडिटी निर्माण करणे असे अनेक पचनाचे आजार सुद्धा निर्माण करतात ,
डाळी पचाव्यात यासाठी किती त्याच्यावर संस्कार करावे लागतात बघा
डाळ शिजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो आपण कुकर वापरून तिला लवकर शिजवतो पण त्यामुळे तिच्यावरचा अग्नि संस्कार अर्धवट होतो व तिच्यामुळे शरीरात निर्माण होणारा टिकावू पणा सुद्धा कमी होतो . त्यामुळे
डाळी पातेल्यातच शिजवाव्यात
डाळ शिजवताना तिचा वातूळ पणा कमी व्हावा म्हणून तिच्यामध्ये आंबट (चिंच ,आमसूल ) हे टाकलेच जाते . (आंबट म्हणजे टोमॅटो नव्हे, ते पुन्हा पित्त वर्धक व रक्त दुष्टीकर आहे ,जिथे जिथे टोमॅटो वापरता तिथे तिथे आमसूल*वापरावे )
आपल्याला हे माहीत नाही कि हे सगळे कश्यासाठी ?? ,
अनेकांना वाटते ते चव येण्यासाठी असेल पण याला शास्त्रीय महत्व आहे, सर्व डाळी या वातूळ ,रुक्ष ( कोरड्या आहेत ), अगदी मूग सुद्धा त्या डाळी खाल्यामुळे शरीरातील वात वाढू नये म्हणून त्यावर अम्ल संस्कार केला जातो अम्ल हा रस वातशामक आहे त्यामुळे ती डाळ काहीशी वात शामक होते, त्याच बरोबर डाळ तयार झाल्यावर त्यावर तूप व लिंबू* टाकले जाते, डाळ कोरडी तर तूप स्निग्ध व पुन्हा लिंबाचा अम्ल संस्कार वातूळ कमी होऊन चांगली पचण्यासाठी
डाळींमधील वात वृद्धीकर गुण कमी करण्यासाठी शास्त्र कारांनी काय काय योजना केली होती याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुरण पोळी
आता पुरण पोळीची रेसिपी पाहुयात
◼️प्रथम चांगली पातेल्यात शिजवली जाते उष्णतेचा संस्कार डाळीतील वाताचा शीत ( थंड ) गुण कमी करण्यासाठी
◼️डाळ शिजून झाली कि तिला गुळा बरोबर पाट्यावर वाटतात येथे दोन गोष्टी होतात गुळ हा त्याच्या स्निग्ध (तैलकट ) व उष्ण गुणामुळे वात कमी करतो व दगडावर घर्षणाने उष्णता निर्माण* होऊन पुन्हा वाताच्या शीत गुणा विरुद्ध उष्ण गुण निर्मिती
◼️गहू स्निग्ध गुणाचा त्याबरोबर लाटताना तैल स्निग्ध व उष्ण गुणाचे
◼️पोळी तयार झाल्यावर भाजणे ,उष्ण गुण वृद्धी
◼️भाजताना तैल ( स्निग्ध व उष्ण ) किंवा तुप ( स्निग्ध ) गुण
◼️पुरण पोळी तयार झाल्यावर गुळवणी ( गुळ गरम पाण्यात उकळून घेणे ) स्निग्ध व उष्ण गूण
◼️गुळवणी व पोळी एकत्र केल्यावर त्यावर पुन्हा तुप स्निग्ध गुणाचे
◼️त्याबरोबर कटाची म्हणजे मसाले अधिक असलेली पाचक व उष्ण मसाले युक्त आमटी व त्यामध्ये अम्ल गुणाचे आमसूल किंवा चिंच उष्ण व अम्ल गुणाने परत वात शमन
◼️त्या आमटीवर लिंबू पिळणे अम्ल गुण वातशामक
◼️तैलात तळलेले पदार्थ जसे कुरडई ,पापडी ( स्निग्ध गुण कमी पडू नये म्हणून )
हरबरा डाळ पचवण्यासाठी एवढे संस्कार करावे लागतात तर तुम्ही मोड आलेले कडधान्य कसे काय खाता ?? ,
ते पचले नाही तर शरीराला फायदा देण्याऐवजी अपायकारकच ठरतील तर चला तर चांगली डाळ शिजवून घेऊन त्यामध्ये आमसूल तूप लिंबू टाकून खावूयात प्रोटिन्स वाढण्यासाठी.