▶️मुंबई- राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात ६९४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात जवळपास ६३ टक्के कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं राज्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्य आरोग्य विभागाकडून नवीन आकडेवारी समोर आली आहे. राज्यात आज दिवसभरात 694 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. आतापर्यंत राज्यात करोनाबाधित रुग्णाांची एकूण संख्या ८१,४३,६८६ इतकी झाली आहे. आज दिवसभरात १८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आजपर्यंत एकूण ७९,९२,२२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. सुदैवाने आज राज्यात आज एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची 3,016 संख्या आहे. 27ऑक्टोबरला 972 प्रकरण समोर आली होती. हीच सर्वात मोठी आकडेवारी होती. पण आता चार आठवड्यांपूर्वी राज्यात कोरोना रुग्णांचा सकारात्मक दर 1.05 टक्के होता. पण 22 ते 28 मार्चदरम्यान कोरोना रुग्णांचा दर हा 6.15 टक्के वाढला आहे. राज्यात सध्या हंगामी साथीच्या आजाराची लक्षणेही रुग्णांमध्ये दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मास्क वापरा, दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर ठेवा, हात सॅनिटायझरने स्वच्छ ठेवा, गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.