
जनशक्तीचा दबाव न्यूज | गुहागर | मार्च ३०, २०२३.
तालुक्यातील क्षत्रिय मराठा युवा संघटना, गुहागर यांच्या माध्यमातून तालुक्यातील तरुणांना एकत्र आणणे व क्षत्रिय मराठा भवन उभारणे हे उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ‘मराठा प्रीमियर लीग’ जानवळे फाट्यासमोरील भव्य मैदानात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, समाजसेवक श्री. संतोष जैतापकर यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले होते.
या विनंतीचा मान ठेऊन या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारोहास श्री. जैतापकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा तालुकाध्यक्ष श्री. निलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस श्री. सचिन ओक, नगरपरिषद गटनेते श्री. उमेश भोसले, गुहागरचे शहराध्यक्ष श्री. संगम मोरे, नगरसेवक श्री. गजानन वेल्हाळ, नगरसेवक श्री. समीर घाणेकर, श्री. संदीप साळवी, आणि अन्य महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जैतापकर यांनी स्पर्धेच्या उत्तम नियोजनाबद्दल आयोजकांचे व स्वयंसेवकांचे कौतुक केले.