चिपळूण : चिपळूण तालुक्यातील दसपटीतील ओवळी, नांदिवसे आदी गावात अनधिकृत लाकूडसाठ्यावर कारवाई सुरू झाल्याने आता सावर्डे व खाडीपट्ट्यातील मोठा लाकूडसाठा गायब करण्यात आला आहे. याला नेमका आशीर्वाद कोणाचा? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. सध्या शहरासह काही ग्रामीण भागातील लाकूड गिरण्यांवर लाकूडसाठा दिसत आहे. त्यामुळे त्याचीही वनविभागाने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून दसपटी, खाडीपट्ट्यातील चिवेली, गाग्रई, मालदोली तसेच सावर्डे आदी भागात मोठ्या तर बहुतांशी गावांमध्ये काही प्रमाणात जंगलतोड होताना दिसते. बेसुमार जंगलतोड होत असतानाही वनविभागाकडून कारवाई मात्र फारशी होताना दिसत नाही. यामागेही राजकीय दबावासह अनेक कारणे आहेत. काही दिवसांपूर्वी दसपटीत होणारी बेसुमार जंगलतोड निसर्गप्रेमींनी प्रकाशझोतात आणल्यानंतर जागे झालेल्या वनविभागाने ओवळी व नांदिवसेे गावातील किरकोळ लाकूडसाठ्यासह अवैध लाकडाची वाहतूक करणारा ट्रकही खडपोली एमआयडीसी परिसरात पकडून तोही जप्त केला. एका व्यावसायिकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६