दिवा (प्रतिनिधी ) दिवा शहरातील प्रतिष्ठीत समाजसेवक तथा भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री रोशन प्रभाकर भगत यांच्या संकल्पनेतून आज प्रभु श्रीराम नवमीनिमित नागरिकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिलेल्या महाआरोग्य शिबीराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून 250 पेक्षा जास्त जणांनी लाभ घेतला आहे.प्रभु श्रीराम यांचे आपल्या प्रजेप्रती असलेले प्रेम,सेवा आणि येथील समाजसेवक श्री रोशन भगत यांनी जनतेसाठी उपलब्ध करुन दिलेली औषधोपचार सेवा आणि दिव्यातील जनतेसाठी असलेली कळवळ ही आदर्शवत अशीच दिसून येत आहे.
आज दिवसभरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.या दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी दिवा शहर पुरस्कृत आदर्श मित्रमंडळ आणि समाजसेवक श्री रोशन भगत यांच्या संकल्पनेतून आज मुंब्रा देवी काँलनी भाजपा कार्यालय येथे मोफत महाआरोग्य शिबीर पार पडले.या शिबीरात लहान मुले,नागरिक,वृद्ध महिला-पुरुष आदींना या शिबीराचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.सकाळी 10 वाजल्यापासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.या शिबीरात एन्जीओप्लास्टी शस्त्रक्रिया,बायपास शस्त्रक्रिया ,वाल्व शस्त्रक्रिया,थ्रोंबोलायझेशन उपचार,डोळे तपासणी,लहान मुलांचे विकार आदींसह विविध तपासण्या मोफत ठेवण्यात आल्या होत्या.महाआरोग्य शिबीरात 200 ते 250 जणांनी आपल्या विविध तपासण्या केल्या.
या महाआरोग्य शिबीराला भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री सतीशभाऊ केळशीकर,टायगर गृपचे अध्यक्ष तथा गोल्डन मॅन संदेश भाऊ पवार,जागा हो दिवेकरचे प्रणेते श्री विजय भोईर, श्री विनोद भगत, भाजपा युवा मोर्चाचे श्री सचिन भोईर,श्री समिर चव्हाण, श्री जयदिप भोईर,सौ.सपना भगत आदींसह अऩेक मान्यवरांनी या शिबीराला उपस्थिती दर्शविली आहे.
सदरचे महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी आदर्श मित्रमंडळाचे पदाधिकारी,ठाण्यातील बाँर्निओ हास्पीटलचे कर्मचारी डाँ.अनुराग गुप्ता,डाँ.पूजा,सिस्टर रश्मी,श्री सूरज पांडे आणि धर्मवीर आनंद दिघे ह्रदयरोग व उपचार केंद्राचे वैद्यकीय जनसंपर्क अधिकारी नरेद्र मोरे, वैद्यकीय जनसंपर्क अधिकारी प्रमोद सासे, डाँ.चंदन, डाँ.स्नेहा गायकवाड, सि.सोमन आदींनी विशेष मेहनत घेतली.