मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून सेंट जॉर्ज रुग्णालयात वेगळा विभाग
मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मुंबई, महाराष्ट्रातही कोरोनाने एन्ट्री केल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता आलेख बघता मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये कोविडच्या उपचारासाठी बनवलेले वॉर्ड तब्बल वर्षभरानंतर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये टप्याटप्याने वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सेंट जॉर्जे रुग्णालयातील काही भाग हा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. रुग्ण संख्येमध्ये वाढ झाल्यास टप्प्याटप्याने या रुग्णालयाचे रूपांतर संपूर्ण करोना रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी कोणती उपाययोजना करावी, यासाठी जे. जे. रुग्णालयामध्ये विशेष समितीची स्थापनाही करण्यात येणार आहे.