⏩ उद्यापासून सुरु होणारे आयपीएलचे सामने मोबाईलवर आणि टीव्हीवर कुठे पाहाल?*

Spread the love

▶️ लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येणार आहे, सविस्तर जाणून घ्या…

मुंबई l 30 मार्च – ३१ मार्चला आयपीएलची ओपनिंग सेरेमनी होणार असून चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात पहिली लढत होणार आहे. सर्व आयपीएल सामन्यांचे प्रसारण आणि लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येणार आहे, सविस्तर जाणून घेऊया.

पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखालील संघ आमनेसामने असतील. यावेळी सर्व संघ घरच्या मैदानावर ७ सामने आणि इतर मैदानांवर ७ सामने खेळतील. या ५२ दिवसांच्या लीगमध्ये एकूण ७० लीग सामने १२ ठिकाणी खेळवले जातील, ज्यामध्ये १८ डबल हेडर असतील.

आयपीएल २०२३ चे सामने ऑनलाइन कुठे पाहता येणार

या सिझनमधील सर्व सामने जिओ सिनेमावर विनामूल्य लाइव्ह-स्ट्रीम केले जातील. याशिवाय, JioCinema आयपीएल २०२३ च्या सिझनद्वारे ७०० दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांना 4K फीड, मल्टी-लँग्वेज आणि मल्टी-कॅम प्रेझेंटेशन, स्टॅट्स पॅक आणि प्ले अलॉन्ग वैशिष्ट्यांद्वारे हे लाईव्ह प्रसारण अधिक मनोरंजक करणार आहे.

आयपीएल २०२३चे सामने टिव्हीवर कुठे पाहता येणार

 स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या टीव्ही चॅनेलवर यंदाच्या आयपीएलचे लाईव्ह सामने पाहता येणार आहेत. हे टेलिकास्ट एसडी आणि एचडी दोन्ही चॅनेलवर असेल. तसेच हिंदी आणि इंग्रजीशिवाय अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हे लाईव्ह उपलब्ध असेल.

BCCI द्वारे पॅकेज A अंतर्गत टीव्ही अधिकार भारतीय प्रसारकांना विकले जातात. पुढील पाच वर्षांसाठीची निविदा गेल्या जूनमध्ये झाली होती. डिस्ने स्टारने प्रसारण हक्कांसाठी सर्वाधिक बोली लावली होती. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारतात टेलिव्हिजनचे अधिकृत प्रसारण हक्क आहेत. करारानुसार, प्रसारक २०२३ आणि २०२४ मध्ये प्रत्येकी ७४ सामने आणि २०२५ आणि २०२६ मध्ये प्रत्येकी ८४ सामन्यांचे प्रसारण करेल. २०२७ च्या आवृत्तीत ९४ खेळांचे प्रसारण होईल.

IPL २०२३चे लीग सामने दुपारी ३.३० आणि संध्याकाळी ७.३० या वेळेत खेळवले जातील. तर प्लेऑफचे सर्व सामने संध्याकाळी ७.३० पासून सुरू होतील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page