मुंबई: कुणबी चेम्बर्स अँड इंडस्ट्रीज प्रोत्साहन परिषद 2023 गडकरी रंगायतन ठाणे येथे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या सम्पन्न. दिनांक 25 मार्च रोजी कुणबी समाजबांधवानी नोकरीं करण्यापेक्षा नोकरीं देणारे व्हावे यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल असे मत मा. उदयजी सामंत यांनी व्यक्त केले. तर संस्थापक श्रीमान अशोकजी वालम यांनी कुणब्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी सर्वांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आपले आर्थिक व राजकीय अस्तित्व आपणच उभे करू असेही श्री वालम साहेब यांनी सांगितले. माजी आमदार श्रीयुत दिगंबर विशे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिषदेत kcci ची संकल्पना अध्यक्ष श्रीमान प्रेमनाथजी ठोंबरे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिले. सचिव ऍडवोकेट अजय पाटील यांनी एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हे ब्रीद वाक्य उदघोषित करून कार्यकामाचे विस्तृत प्रास्ताविक करताना kcci च्या संघटनेची ध्येय धोरणे, कार्य पद्धती, रचना, कार्य तसेच कुणबी समाज बांधवाना उद्योगासाठी एक लाखापासून पन्नास लाखापर्यंत विनव्याजी कर्ज उपलब्ध होणाऱ्या शासकीय योजनाची माहिती सांगितली .तसेच मुंबई कुणबी समजोन्नती संघास मुलुंड वसतिगृहासाठी सरकारकडून सात कोटी रुपये दिल्याबद्दल भूषण बरे साहेव व संघाकडून मंत्री महोदयांचा सत्कार करणेत आला.त्यानंतर अनेक तज्ज्ञ व्याख्यात्यांनी विविध विषयांवर उद्बोबोधक मार्गदर्शन करताना नागपूरवरून आलेले कुणबी तज्ज्ञ आशिष राऊत यांनी मानसाशास्र व जिएसटी या विषयावर, सुनिलजी आग्रे यांनी उद्योगावर प्रेरणादायी अनुभव विषद केले, असिस्टंट फूड कमिशनर कुमारी प्रियांका विशे यांनी फूड लायसन्स या विषयावर,श्री गुप्ते यांनी व्यवसायातील आपली भूमिका व जिएसटी या विषयावर तर सेवानिवृत्त सेल्स टॅक्स ऑफिसर श्रीमान अशोकजी विशे यांनी kcci ची गरज कमिटीचे योगदान व सर्वानी घ्यावायचा सहभाग या विषयावर आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दिगंबर विशे सर यांनी kcci च्या सर्व कार्यकारणीचे कौतुक केले तर काळाची गरज ओळखून कुणबी समाजाने या स्तुत्य कार्यात सहभागी होऊन आपला उत्कर्ष करून घेण्याचा मार्मिक सल्ला दिला. सरते शेवटी सहसचिव ऍडव्होसेट विनेश अशोक वालम यांनी सर्वांचे आभार मानले kcci चा स्वतंत्र हॉल होऊन युवकांचा सहभाग मोठ्या स्वरूपात असेल असा उदघोष केला. या कार्यक्रमासाठी समाजभूषण श्रीमान किसनजी बोन्द्रे व अशोक विशे साहेब यांनी यांनी मान्यवराना सन्मान चिन्ह व मानाचा दुपट्टा दिला व व्यवस्थापकाची भूमिका बजावली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके सर व सुनील माळी सर यांनी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमांची सांगता झाली.