
ठाणे: प्रतिनिधी (निलेश घाग) दिव्यांग हयुमन राईट फेडरेशनच्या वतीने माननीय मुख्यमंत्री ,माननीय राज्यपाल, माननीय जिल्हाधिकारी मेलद्वारे व तसेच भेटुन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त बांगर साहेब, समाज विकास अधिकारी वाघमारे साहेब, आणि उपायुक्त, समाज कल्याण समाज कल्याण विभाग दीक्षित मॅडम यांना दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनने निवेदन देऊन व त्यांच्याशी चर्चा करून राष्ट्रीय प्रा. भरत जाधव सर, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष मोरे व तसेच राष्ट्रीय सचिव रवींद्र देसाई यांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय बांगर साहेब यांना सर्व दिव्यांगांना चिट्ठी न काढता अनुदानाचे वाटप करावे कोणावर अन्याय व उपाशी रहाता होता कामा नये. वर्षानुवर्ष जे पात्र दिव्यांगांना अनुदान वाटप केले जाते त्यात कोणावरही अन्याय होऊ नये अशी मागणी करून सर्व पात्र दिव्यांगांना सरसगट अनुदानाचे वाटप करण्यात यावे अशी मागणी केली त्याबद्दल आयुक्त साहेबांनी सरसकट सर्व पात्र दिव्यांगांना असे अनुदान देऊ असे मान्य केले.

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत राहत असलेले रहिवासी व राज्याचे प्रथम नागरिक माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना दिव्यांगाना अनुदानापासून वंचित ठेवून उपाशी ठेवणे योग्य होईल का??? याचा विचार करून ठामपा प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक सर्व दिव्यांगांना अनुदान द्यावे अशी मागणी केली.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पात्र दिव्यांग उपाशी राहणार नाही ही परंपरा प्रशासनाने मोडीस काढू नये सर्व दिव्यांगाना अनुदान द्या “दिव्यांगाचा… हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे” अशी मागणी* “दिव्यांग हयुमन राईट फेडरेशनच्या’ वतीने करण्यात आली जर ती मान्य होत नसेल चिट्टी काढून जर अनुदानाचे वाटप केले जात असेल तर दिव्यांग हयुमन फेडरेशन बेमुदत उपोषण करेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. भरत जाधव सर यांनी सर्व दिव्यांगांच्या वतीने माननीय आयुक्त अभिजीत बांगर साहेब यांच्यासमोर केलेली आहे. आणि त्यांच्या या मागणीला ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने हिरवा कंदील दाखवून सर्वांना अनुदान दिले जाईल अशी त्यांना ग्वाही दिलेली आहे हा दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन व इतर संस्था चा विजय आहे..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा