स्वामी कट्टा पालखी सोहळ्यात वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

मुंबई(शांताराम गुडेकर )

         आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराच्या वतीने यावर्षी कार्याध्यक्ष- भास्कर साळुंके यांच्या संकल्पनेने प्रथमच पालखी सोहळ्यात वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास स्वामी भक्तांनी उत्तम प्रतिसाद दिला.

          वेशभूषा स्पर्धा चार गटात घेण्यात आली. छोट्या गटात (मुली)-स्वानंदी मेस्त्री, प्रज्ञा साळुंके, (मुलगे) – मयांक कदम, सत्यम तापेकर, शिवम तापेकर, अंतिम विजयी झाले.खुल्या गटात-(महिला) स्नेहल पाटील, कुंदना पंडित, शितल आंबेकर व (पुरुष) गटात  जगदीश सावंत हे अंतिम पुरस्काराचे मानकरी ठरले.सर्व विजयी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम, देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण – पत्रकार- अनघा सावंत व समुपदेशक – अश्विनी कदम यांनी केले. व्यासपीठावर श्री स्वामी कट्टा परिवाराचे अध्यक्ष-बाळ पंडित,सचिव-राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष- भास्कर साळूके व कोषाध्यक्ष-रवींद्र रेवडेकर उपस्थितीत होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page