मुंबई (शांताराम गुडेकर )
महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून अग्रेसर असलेली आणि बोरिवली परिसरात जनतेच्या विविध समस्येवर नावीन्य पूर्ण काम करत असलेल्या “आम्ही सावित्रीच्या लेकी”या संस्थेचे बोरिवली येथे चिंतन शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रमेश नागावकर(डेप्युटी चीफ इन्स्पेक्टर,मुंबई)यांची उपस्थिती लाभली होती.त्यांनी संस्थेच्या सर्व प्रोजेक्टच्या कामाची प्रशंसा केली.तर विशेष अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून अहिल्याबाई होळकर सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा मा.संदीप नाचन सर उपस्थित होते.त्यांनी संस्था आणि संस्थेचे कामकाज वाढवण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले .
संस्थापिका सौ.सरिता खेडेकर मॅडमनी येणाऱ्या पिढीवर कोणते संस्कार केले पाहिजे याची सखोल माहिती दिली.अध्यक्षा सौ अंकिता चिंचघरकर आणि उपाध्यक्षा सौ.दिप्शा बोरले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.शुभदा गोरुले,सौ.सोनल आग्रे,सौ.अर्चना लष्कर,सौ.उषा वाईकर,सौ.शारदा विश्वकर्मा आणि श्री.विनायक महाडिक,श्री.दत्ता केलस्कर,श्री.सचिन गावडे यांनी सभेचे योग्य नियोजन करून शोभा वाढवली.सचिव श्री. सुनिल भ.भोसले यांनी प्रार्थनापासुन सभेची चांगली सुरुवात करून उपस्थित प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक आणि उपस्थित नवीन ट्रस्टी या सर्वांचे आभार आणि पसायदान घेवून शिबीरची सांगता केली.संपूर्ण शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.