सिंधुदुर्ग : रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपलब्ध करून सुमारे ६०० कोटी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ३२० कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे येथील रस्त्यांचे मजबुतीकरण होऊन पालटणार असल्याची माहिती भाजपाचे -सिंधुदुर्ग प्रभारी, माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषदेच्या रस्त्यांना पूर्वी ४-५ कोटीचा निधी मिळत असे. पण हे रस्ते आता बांधकाम विभागाच्या कक्षेत घेण्याचा निर्णय मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील रस्त्याचा आता कायापालट होणारआहे. या निधीतून अर्धवट स्थितीतील रस्त्यांची डांबरीकरणाची कामेही मार्गी लागणार आहेत. कोकणातील साकव कार्यक्रमांसाठीही केंद्राकडे सुमारे १६०० कोटी रुपयांची मागणी मंत्री चव्हाण यांनी केली. त्यामुळे छोटे असणारे साकवांचे रुंदीकरण होऊन त्यावरून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे जठार यांनी सांगितले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीचे जठार यांनी समाधान व्यक्त केले. रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी तब्बल साडेसहाशे कोटी रुपये रस्त्यांच्या विकासासाठी दिले आहेत. संगमेश्वर येथे १०० एकरवर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी १० कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे.