मुंबई – राज्यात मागील वर्षी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर वेगवान घडामोडी घडल्या. शिवसेनेचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह थेट सूरतमार्गे गुवाहाटीला पोहचले. शिंदे यांच्या पवित्र्यामुळे उद्धव ठाकरेंना जबर फटका बसला. राज्यातील सरकार अल्पमतात आल्यानं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-ठाकरे कधीही एकाच व्यासपीठावर दिसले नाहीत. मात्र नवीन वर्षी हा योगायोग जुळून येण्याची शक्यता आहे.